२०१२ नंतर जिल्हा पुन्हा फळबागा विना !

Foto

राज्यात पडलेल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. आपल्या फळबागा जागवताना त्याच्या नाकीनऊ येत आहे. जिल्हयात फळबागांचे क्षेत्र वाढावे म्हणून कृषी विभागाने खूप प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी  फळबाग लागवड करावी म्हणून कृषी विभागाला कित्येक दशके परिश्रम करावे लागले. फळबागांचे तंत्रज्ञान, रोपे तसेच भरमसाठ अनुदानही द्यावे लागले. २००७-८  नंतर शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले. मात्र, सततच्या दुष्काळाने फळबागा जगवणे मोठे जिकिरीचे बनले आहे.  जिल्ह्यात पैठण (२६३४ हे) गंगापूर (१९०१ हे.)आणि वैजापूर (११९८ हे) या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड झाली. २०१२ च्या दुष्काळात जसा जिल्हा फळबागविना झाला आहे.  तशीच स्थिती या वर्षी आहे.

जिल्ह्यातील फळबागांचे क्षेत्र
एकूण फळबाग क्षेत्र : १५,४६७ हेक्टर
आवळा : ६३ हेक्टर
केळी : ५७९
बोर : ६५
चिकू : १४७०
द्राक्ष  : १३९
पेरू : ७३२
लिंबू : २३०
आंबा : १०४५
मोसंबी : ७८९६
डाळिंब : २२६७
सीताफळ : ५७०
अंजीर : १४५२

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker